हेल्पलाइन क्र: 7894561236
Visitors: 45
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे गावातील वाहतुकीस सोयीस्कर
...

17-09-2025 , 07:58 AM

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड ही गावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात ग्रामपंचायत, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते.

...

12-09-2025 , 08:01 AM

भटकंती गायींचा वासस्थान परंपरा

रायगड नगर गावाचे एक विशेष असे आहे की ह्या गावात अनेक वर्षांपासून 200/250 भटकंती गायी संध्याकाळी वास्तवास आहेत. संध्याकाळी 7 वाजता गावातील मंदिराजवळ जमतात सकाळी परत चरायला जातात त्यामुळे बरेच वेळा गावात शेणाचा सडा जमतो

...

16-09-2025 , 06:15 PM

कचरा व्यवस्थापन व कंपोस्ट पिट

रायगडनगर गावात कचरा व्यवस्थापनासाठी घरगुती कचरा ओला व सुका अशा प्रकारे वर्गीकृत केला जातो. ओला कचरा कंपोस्ट पिटमध्ये टाकून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते, जे शेतकरी शेतीसाठी वापरतात. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ राहते, शेतीसाठी नैसर्गिक खत मिळते आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते.

...

05-09-2025 , 07:16 AM

आरोग्य जनजागृती

रायगडनगर गावात आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. गावात नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांची तपासणी केली जाते. गर्भवती व स्तनदा मातांसाठी विशेष मार्गदर्शन, लहान मुलांच्या लसीकरणाची 100% अंमलबजावणी, तसेच महिलांना पोषण व स्वच्छतेबाबत माहिती दिली जाते. ग्रामपंचायत व आरोग्य कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे गावात रोगप्रतिकारक क्षमता वाढली असून नागरिक अधिक आरोग्यदायी जीवन जगत आहेत.

...

17-11-2025 , 01:03 PM

रायगड नगर येथे मुखमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान करवसुली मोहीम

रायगडनगर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करवसुली मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध व्हावा, ग्रामपंचायतींची आर्थिक शिस्त मजबूत व्हावी आणि नागरिकांना स्वच्छ, पारदर्शक प्रशासन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

...

12-11-2025 , 08:06 PM

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रसार

रायगड नगर येथे ग्रामपंचायत अधिकारी श्री गणेश पगारे रात्री गावामध्ये तरुण युवा सोबत घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रसार प्रसिध्दी करताना