15/08/2025, 01:14 pm
रायगडनगर गावात स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे, टी.बी. मुक्त गाव बनविण्यासाठी उपाययोजना, हँडवॉश व स्वच्छतेसंबंधी कार्यशाळा घेणे, तसेच महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात येईल.
15/10/2025, 05:32 pm
रायगडनगर गावात महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिर आयोजित केले गेले. कार्यक्रमात मोफत सॅनिटरी पॅड वितरण करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील महिलांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यावर भर देण्यात आला. उपस्थित महिलांनी मार्गदर्शन सत्रात सहभागी होऊन आरोग्य विषयक माहिती घेतली
23/10/2025, 10:00 am
रायगडनगर प्राथमिक शाळेत नवीन प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. यासोबत शाळेत पाण्याची टाकी आणि हँडवॉश सुविधा सुरू केली गेली. कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. उपस्थितांनी शाळेच्या नव्या सुविधांचा अनुभव घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व आरोग्याची महत्त्वाची माहिती दिली.